सामाजिक जीवन आणि व्यक्तिमत्व विकास यांचा घनिष्ट संबंध आहे. घाईगर्दीच्या युगात, वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत, त्याच गतीने स्वत:ला बदलताना व्यक्ती अनेक छोट्या मोठ्या समस्यांनी वेढला गेला आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने समुपदेशन मानसशास्त्राची इथे मदत होऊ शकते.
पूर्वीही पारंपारिक पद्धतीने केले जाणारे समुपदेशन अस्तित्वात होते, आजही आहे. पालक आपल्या मुलांना, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना, धर्मोपदेशक आपल्या अनुयायांना सूचना/उपदेश करत असत. पण मागील शतकापासून या शास्त्राचा विकास होऊ लागला.
ह्या प्रवासाचे विविध टप्पे, विविध संकल्पना, ह्यांची माहिती या ब्लॉगवर मी करून देणार आहे.
आपल्या अपेक्षा आणि सूचना, विचार नक्की कळवा..

Sunday, 10 July 2011

सिग्मंड फ्रॉईड:2

प्रेम, परिवार आणि त्याचं काम फ्रॉईडच्या आयुष्यात महत्वाचे होते. १८८२ मध्ये ज्यू मार्था ह्या ज्यू धर्मगुरूच्या मुलीशी त्याचे लग्न ठरले. लग्नासाठी आणि नंतरच्या आयुष्यासाठी पैशांची  सोय व्हावी म्हणून मानसोपचार केंद्रात त्याने काम सुरु केले. १८८६ मध्ये त्याने लग्न केले आणि त्याच सुमारास व्हिएन्ना येथे neuropathology  clinic सुरु केले. मोठ्या परिवाराचा सदस्य असल्याचा परिणाम असेल, त्याचा स्व:ताचा परिवारही मोठा होता. त्याला ६ मुले झाली. मार्थाची बहिण मीना सुद्धा  कुटुंबाची सदस्या होती. १८८२ ते १८८६ या चार वर्षांच्या काळात फ्रॉईडने जवळ जवळ ९०० पत्रे मार्थाला लिहिली, ज्यात त्याने आपल्या कामाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.  फ्रॉईड आणि मार्थाने आपल्या मुलांना संगोपनासाठी योग्य असे वातावरण राखण्याचा नेहमीच प्रयत्न केला. असे वातावरण ज्यात चिंता कमी असेल, मर्यादा आणि टीका कमी असेल, व्यक्तिमत्व फुलायला वाव असेल. दिवसाला १० पेक्षा जास्त रुग्णांना तो भेटत असे तरीही त्याचे विविध छंद, जसे इतिहासाचा अभ्यास, वाचन, mushroom चा अब्यास, पर्यटन यांसाठीही वेळ देत असे. परिवाराच्या सुख-दु:खाचा त्याच्यावर खोल परिणाम दिसून येतो. जीवनातील काही घटना जसे, त्याच्या ३ मुलांनी सैन्यात जाने, एकाचा प्रथम महायुद्धात झालेला मृत्यू, सोफी नावाच्या मुलीचा १९२० मध्ये झालेला मृत्यू, नातवाचा मृत्यू (१९२३), यांचा त्याच्यावर खोल परिणाम झाला.
                     १९२३ मध्ये फ्रॉईडला कर्करोग असल्याचे निदान झाले. त्याच्या उर्वरित आयुष्यात त्याच्या जबड्यावर ३३ शस्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्याचे आयुष्य तर वाढले पण त्याचबरोबर वेदनाही.  १९३८ मध्ये नाझींनी ऑस्ट्रियाचा ताबा घेतला. ८२ वर्षाचा आणि खूप आजारी असूनही फ्रॉईडने ऑस्ट्रिया सोडण्याचा निर्णय घेतला. जून १९३८ मध्ये तो आणि त्याचा परिवार इंग्लंडला स्थलांतरित झाला. त्याच्या ४ बहिणींना मात्र व्हिएन्ना सोडण्याची परवानगी नाकारण्यात आली. फ्रॉईडला देखील आपली सर्व संपत्ती सोडून जाण्याचा आदेश होता. पुढील ५ वर्षात त्याचा व्हिएन्न मधील परिवार छळ छावण्यांत बळी गेला.
                     इंग्लंडमध्ये पुन्हा शस्रक्रिया होऊनही त्याचा कर्करोग बळावत गेला. त्याला आपला मृत्यू येईपर्यंत काम करत राहायचे होता, लिहित राहायचे होते. त्यामुळे त्याने सगळी औषधं बंद केली. २३ सप्टेंबर १९३९ साली त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे त्याने केलेल्या कामाचा प्रचंड वारसा आहे ज्यावर आजचे मानसशास्त्र  आकारले आहे. 

Sunday, 3 July 2011

सिग्मंड फ्रॉईड : Father of Psychology

१९९३ मध्ये Time Magazine ने प्रश्न विचारला,"सिग्मंड फ्रॉईड खरंच मेलाय?" मनोविश्लेषणवाद आणि सिग्मंड फ्रॉईडचे मानसशास्त्राबद्दलचे  विचार काळाच्या बदलत्या स्वरूपाशी सुसंगत आहेत का? हा प्रश्न वारंवार विचारला गेलाय. पण हा प्रश्न वारंवार विचारला जाणं आणि त्यावर होणारी चर्चा ह्यातच फ्रॉईडच्या विचारांची मानसशास्त्रावर  असलेली पकड दिसून येते. १९९८-१९९९ मध्ये Library of Congress, Washington DC येथे Sigmund Freud: Conflict  and  Culture या विषयावर एक मोठे चर्चासत्र भरवण्यात आले होते. जगभरातील बहुतेक समुपदेशक, वैद्यकीय समुपदेशक, मनोचिकित्सक मान्य करतात कि एखाद्या मानसिक समस्येकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन फ्रॉईडच्या सिद्धांतावर आधारित असतो. सिग्मंड फ्रॉईड आपले व्यक्तिमत्वाबद्दलचे, विकासाबद्दलचे विचार आधुनिक  करण्यात कमालीचा यशस्वी झालाय. त्याचं काम धाडसी स्वरूपाचं होतं. तो त्याच्या समकालीन सहकाऱ्यांपासून अत्यंत वेगळ्या विचारसरणीचा होता. वेळोवेळी आणि आयुष्यभर त्याच्यावर होणाऱ्या लेखी/तोंडी टिकांना समर्थपणे पेलत त्याने आपले सिद्धांत ताडून मजबूत केले. त्याच्या अथक प्रयत्नांमुळेच आज मानसशास्त्रज्ञांना लोकांच्या मानसिक समस्यांवर तोडगा काढणे आणि मानसिक शांती मिळणे सहज शक्य झालेय.
 
The Person Who Developed Psychoanalysis :
                                                  सिग्मंड फ्रॉईडचा जन्म ६ मे १८५६ मध्ये फ्रीबर्ग, मोराविया येथे झाला. त्याचे वडील ४० वर्षांचे, विधुर होते जेव्हा त्यांनी  फ्रॉईडच्या आईशी लग्न केले (वय वर्ष १९!). फ्रॉईडच्या वडिलांना आधीच्या लग्नापासून २ मुले होती. फ्रॉईड ह्या दाम्पत्याचे पहिले अपत्य. १० वर्षात त्यांना आणखी ७ मुलं झाली. पण आईचा लाडका आणि सगळ्यात मोठा म्हणून फ्रॉईडचे स्थान नेहमीच विशेष होते. त्याचे वडील एक प्रतिष्ठित व्यापारी होते.नम्र पण शिस्तप्रिय स्वभावाचे वडील हा मुलाचा आदर्श होता. फ्रॉईड १ १/२ वर्षाचा असताना त्याचं ८ महिन्याचा भाऊ, जुलिअस वारला. फ्रॉईडने लिहून ठेवलंय कि तो होता तेव्हा त्याच्याविषयीची द्वेषभावना मनात असायची पण त्याच्या मृत्युनंतर मात्र  त्याला स्वत:बद्दल घृणा  वाटत असे आणि त्याच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहोत अशी समजूत त्याची झाली होती. हि व इतर बालपणीच्या आठवणी आणि त्यांचा मनावर होणारा/झालेला परिणाम यावरूनच फ्रॉईडने त्याच्या अभ्यासात / संशोधनात विकासातील बालपणाच्या टप्प्याला महत्व दिले आहे.
                                                     फ्रॉईड ज्यू होता. ज्युईश संस्कृती आणि धार्मिक विचारांनी फ्रॉईडच्या जीवनातील अनेक घटकांवर परिणाम झाला. त्यांची संस्कृती, शिक्षण आणि परिवाराला दिलेले महत्व यांचा परिणाम   फ्रॉईडच्या शिक्षण, इतिहासाची आवड,  विषयाचा सखोल अभ्यास करणे यांवर दिसून येतो. ज्यू असल्याचा परिणाम त्याच्या राहण्याची जागा, शहर, त्याने निवडलेला व्यवसाय आणि कदाचित त्याच्या कामाला  मिळालेला प्रतिसाद यांवरही झाला. आणि अर्थातच हिटलरच्या उदयानंतर त्याला ऑस्ट्रीया सोडणे भाग पडले.
                                                फ्रॉईड लहान असताना ज्यूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्याचा परिवार व्हिएन्ना,ऑस्ट्रीया येथे स्थलांतरित झाला. (त्याकाळी तुलनेने सुरक्षित शहर!) इथेच त्याचे बरेचसे आयुष्य गेले.   फ्रॉईड मेहनती विद्यार्थी होता. १८७३-१८८१ या काळात व्हिएन्ना विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. ज्यू लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या शिक्षण सुविधांत वैद्यकीय, कायदा आणि व्यवसाय यांचा समावेश होता.  फ्रॉईडला समाजशास्त्र आणि राजकारणात रस होता पण त्याने त्यातल्या त्यात सोयीचे आणि योग्य असे वैद्यकशास्त्र अभ्यासासाठी निवडले. त्याला 'मन/मेंदू' हा विषय अभ्यासायचा होता. त्यामुळे त्याने Neurology विषय अभ्यासाला घेतला आणि त्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यापेक्षा संशोधनाकडे वळला..

Wednesday, 22 June 2011

चिंता(Part 2)

3. Phobic Disorder / दुर्भिती:
Clustrophobia.. Acrophobia.. Xenophobia.. Seems to be the names from Greek Tragedy no? They are not! They are actually members of a class of disorders known as Phobias. Phobias are intense,irrational fears of specific objects or situations.
e.g. Clustrophobia is a fear of enclosed places, Acrophobia is a fear of high places, and Xenophobia is a fear of strangers.
   ग्रीक पुराणातील फोबास या भीतीच्या देवतेच्या नावावरून फोबिया हा शब्द रूढ झाला. मराठीत ह्याला "दुर्भिती" म्हणतात. एखादी वस्तू,घटना, व्यक्ती धोकादायक नसतानाही तीव्र भीतीची भावना दिसून येते. व्यक्तीला वाटणारी भीती निरर्थक, अतार्किक असते. व्यक्ती अशा भीतीचे कारणही सांगू शकत नाही तसेच एखादा इंद्रियजन्य दोषही इथे दिसून येत नाही.
  Although the objective danger posed by an anxiety-producing stimulus is typically small or nonxeistent,to the individual suffering from the phobia it rapresented great danger, and a full-blown panic attack may follow the exposure to the stimulus. Phobias differ from generalized and panic disorders in that there is a specific, identifiable stimulus that sets off the anxiety reaction.
  ज्या उद्दिपाकांमुळे दुर्भिती निर्माण होते ते टाळल्यास व्यक्तीला दुर्भितीचा फारसा त्रास होत नाही मात्र बंद जागा, पाणी, अनोळखी व्यक्ती अशा गोष्टींची दुर्भिती असल्यास व्यक्तीचे दैनंदिन आयुष्य कठीण होऊन बसते.
 
4. Obsessive-compulsive Disorder / विचार-कृती अनिवार्यता विकृती:
"A disorder characterized by obsessions and compulsions."
    An obsession is a thought or idea that keeps recurring in one's mind..
एखादा नकोसा, निरर्थक विचार सातत्याने पुन्हा पुन्हा मनात येतो. मानगुटीवर भूत बसल्याप्रमाणे, पायात काटा शिर्ल्याप्रमाणे अनाहूत विचार मनात घर करून राहतात. व्यक्तीने हे विचार कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला यश मिळू शकत नाही.  बहुदा असे विचार क्षुल्लक विषयाशी निगडीत आणि निरर्थक असतात. जसे, गास्चे बटन बंद केले आहे का? एखाद्या व्यक्तीला जखमी करण्याचे किंवा मारण्याचे विचार, जीवाणूंचा संसर्ग झाल्याचे विचार,इत्यादी.
Of course, many of us suffer from mild obsessions from time to time. (Ever experianced hearing the same tune again and again playing in mind,however you try to shut it off??) For people with serious obsessions,however, the thought persist for days or months and is troublesome.
  As a part of it, people may also experience compulsions,urges to repeatedly carry out some act that seems strange and unreasonable, even to them. Whatever the compusive behavior, people xeperience extreme anxiety if they cannot carry it out,even if it is something they want to stop. 
व्यक्तीला त्याच्या कृतीतील फोलपणा जाणवूनही अशा कृतींवर नियंत्रण ठेवता येत नाही. उदा. वारंवार घर स्वच्छ करणे, पुन्हा पुन्हा हात पाय धुणे, इत्यादी.
 Unfortunately for those experiencing an obsessive-compulsive disorder, little or no reduction in anxiety results from carrying out a compulsive ritual. They tend to live lives filled with unrelenting tension.
 
The Causes of Anxiety Disorders:
  No single mechanism fully explains all cases of anxiety disorders and each of the models of abnormal behavior has something to say about the causes. Medical model points out at genetic factors, chemical deficiencies in the brain, while behavioral model put emphasis on the environmental factors.

Saturday, 18 June 2011

Anxiety /चिंता (Part 1)

Case Example:
       सुधाला पहिला Panic Attack अचानक, तिच्या M.Sc. च्या परीक्षेनंतर ३ आठवड्यांनी आला.. मित्र मैत्रिणींचा घोळका एका हॉटेल मध्ये बसून गप्पा मारण्यात दंग होता. अचानक सुधाला डोकं जड झाल्यासारखा वाटू लागलं.. काही सेकंदातच तिला प्रचंड धाप लागली..ती बेशुद्ध पडते कि काय असं वाटायला लागलं.. मित्रांच्या लक्षात आला कि ती बरी दिसत नाहीये म्हणून तिच्याच सांगण्यावरून ते तिला दवाखान्यात घेऊन गेले..डॉक्टरकडे जाईपर्यंत ती पुन्हा नॉर्मल झाली होती आणि डॉक्टरांनी सुद्धा सगळ ठीक आहे असं सांगितलं. केलेल्या  चाचण्यांमध्येही काही गडबड दिसली नाही. तरीही सुधाला असं attack पुन्हा आला.. तेव्हा ती theatre मध्ये picture बघायला  गेली होती..
       सुधाला असे attacks वारंवार येऊ लागले.. तिच्या डोक्यात सतत ह्या attacks ची काळजी असे.  तिच्या लक्षात आला कि ती जेव्हा एकटी असते तेव्हा तिला ह्याचा त्रास जास्त होतो.. तिने भीतीने शारीरिक कष्टाची कामं बंद केली, बाहेर जाण, लोकांना भेटणं, काम शोधणं बंद केलं..
The Diagnosis:
       Sudha suffered from one of the major form of psychological disturbance,known as an Anxiety Disorder..
        
     चिंता  हा जीवनाचा स्थायीभाव आहे. विविध प्रसंगांमध्ये आपण हा भाव अनुभवतो. पण ती तात्कालिक असते. जसे,परीक्षेची चिंता, मुलाखातीपुर्वीची चिंता, इत्यादी.  एखादे काम चांगले होण्यासाठी थोड्या प्रमाणात चिंता गरजेचीही असते. पण काही व्यक्तींना मात्र अशी चिंता सातत्याने आणि काही कारण नसतानासुद्धा सतावते. जेव्हा अशा प्रकारची चिंता निर्माण होऊन दैनंदिन जीवनावर त्याचे चुकीचे परिणाम दिसू लागतात, तेव्हा त्याला चिंता विकृती/ Anxiety Disorder म्हणतात.
    
There are Four main types of Anxiety Disorder.
 
1. Generalized Anxiety Disorder / सामान्य चिंता विकृती:
As the name suggest,generalized anxiety disorder refers to a disorder in which an individual experiances long-term, consistent anxiety without knowing why. Beacause of their anxiety they are unable to function normally. Such people feel afraid of something, but are unable to articulate what it is. They cannot concentrate, they cannot set their fear aside and their life become centered on their anxiety. Such anxiety may eventualy result in the development of various physiological problems. Beacause of heightened muscle tension and arousal, individuals with generalized anxiety disorder may experiance headaches, dizziness, heart palpitation and insomnia.
 
2. Panic Disorder / आतांकित चिंता विकृती:
"Anxiety that manifests itself in the form of panic attacks that last form a few seconds to as long as several hours."  Panic Anxiety हे चिंतेचेच आकस्मिक आढळणारे रूप आहे. Panic हा शब्द ग्रीक पुराणातील Pan या देवतेच्या नावावरून घेतलेला आहे. ही देवता रानातून एकट्या- दुकट्या मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरूला घाबरवते, अचानक भयकंपित करते. त्याचप्रमाणे ह्या विकृतीत व्यक्ती अनपेक्षितपणे, धोक्याच्या कुठल्याही पुर्वसंकेताशिवाय आतांकित होते. आणि अशा तीव्र चिंतेतून त्यांना Panic Attacks येतात.
  ह्या स्थितीची लक्षणे व्यक्तिश: बदलतात मात्र सामान्यपणे,धाप लागणे, चक्कर येणे, हृदयाची स्पंदने जलद होणे, शरीराला कंप सुटणे, घाम फुटणे, घशात काही अडकल्यासारखे वाटणे, मलमूत्र विसर्जन अनुभव, छातीत दुखणे आणि आपण मरणार किंवा वेडे होणार अशी भीती वाटणे, इत्यादी लक्षणे दिसतात.